फसवणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: October 14, 2016 06:47 IST2016-10-14T06:47:06+5:302016-10-14T06:47:06+5:30
तालुक्यातील पाने गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट दस्तऐवजांद्वारे तसेच बनावट ओळखपत्रांच्या आधारे

फसवणाऱ्यांना अटक
महाड : तालुक्यातील पाने गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट दस्तऐवजांद्वारे तसेच बनावट ओळखपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन हडप करणाऱ्या चौघांना तालुका पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यासह बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे.
महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन परस्पर विकल्याप्रकरणी चौदा गुन्हे दाखल झाले आहेत. तालुक्यातील पाने, पंदेरी, दापोली आदी गावातील अनेक शेतकरी या गैरव्यवहारांना बळी पडले असून जानेवारी २०१६ मध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन अद्यापही आरोपी व दलाल मोकाटच होते. मात्र नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक पी. एस. पाटील यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेत चौघा जणांना गजाआड केले.
याप्रकरणी पुणे येथील विलास कोतवाल, सयाजी जाधव (पंदेरी), विजय दिघे व लक्ष्मण निंबोरे (रा. पुणे) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)