समुद्रात बुडणाऱ्या चार जणांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 01:28 IST2020-11-21T01:28:01+5:302020-11-21T01:28:13+5:30

रोहन, भावेश, संजय यांची कामगिरी

Four people drowned in the sea | समुद्रात बुडणाऱ्या चार जणांना जीवदान

समुद्रात बुडणाऱ्या चार जणांना जीवदान

n  लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्ली-मांडला/ मुरूड : पुण्याहून पर्यटनासाठी काशिद बीचवर आलेल्या चार युवकांना समुद्रात बुडत असताना वाचविण्यात रोहन खोपकर, वॉटर स्पोर्ट्स व एडव्हंचर्सचे लाइफगार्ड भावेश भोईर व संजय वाघमारे यांना यश मिळाल्याची माहिती काशिद ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे यांनी दिली.
पुण्यातील पिंपरी चिंचवड टीटीएस या कंपनीतील इंजिनीअर्स असलेले सत्यम् कुमार (२१), सुमित बोरकर(२०), अनिरुद्ध गायकवाड (२०), नीरज कुमार (२४), पिरिसिल्ला गुप्ता (२१) व स्वाती लोणकर (१९) हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी काशिद बीचवर आले होते. या वेळी सत्यम् कुमार, सुमित बोरकर, अनिरुद्ध गायकवाड व नीरज कुमार यांना समुद्रात पोहण्याचा मोह अनावर झाल्याने समुद्रात गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यांचे ओरडणे ऐकून लगेचच रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व एडव्हंचर्सचे लाइफगार्ड यांनी स्पीड बोटीच्या साहाय्याने चार युवकांचे प्राण वाचविले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Web Title: Four people drowned in the sea