शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 01:14 IST

गंभीर बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालानातील सॅनिटायझर मशीन बंद असल्याचे दिसून आले.

आविष्कार देसाईरायगड : कोरोनाला अटकाव करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनही मागे राहिलेले नाही, परंतु येथील शिवतीर्थ इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या १२ सॅनिटायझर मशीनपैकी ८ मशीन सुरू तर ४ मशीन बंद असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये समोर आले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालानातील सॅनिटायझर मशीन बंद असल्याचे दिसून आले.रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी तब्बल २१ हजारांचा आकडा पार केला आहे. दररोज सरासरी ४०० रुग्ण सापडत आहेत, तर किमान १० रुग्णांचा मृत्यू होत आहे. १७ हजारांहून अधिक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून परत येत आहेत. यामध्ये आरोग्य यंत्रणेचे मोठे श्रेय असल्याचे कोणालाच नाकारता येणार नाही. ग्रामीण विकासाचा गाडा ओढण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. केंद्र, राज्य, तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना आखण्यात येतात. त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. जिल्ह्यात १५ तालुके आहेत, तर एक पनवेल महानगरपालिका आणि किमान १० नगरपालिका आहे. महानगर, शहराचा भाग सोडला, तर उर्वरित ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारीही जिल्हा परिषदेवर आहे.जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कोरोनाचा धोका पाहता, अशा नागरिकांमार्फत कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सुमारे १२ सॅनिटायझर मशीन लावल्या आहेत.शिवतीर्थ इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले एक सॅनिटायझर मशीन सुरू होते. याच तळमजल्यावर समाजकल्याण सभापती, अर्थ व बांधकाम सभापती बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. बांधकाम विभागामध्ये सर्वाधिक नागरिक, ठेकेदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांची वर्दळ होती. प्रवेश करताना नागरिक सॅनिटायझरचा वापर करताना दिसून आले.>कु ठल्या मशीन झाल्या बंद : पहिल्या मजल्यावर चार सॅनिटायझर मशीन आहेत, त्यातील तीन बंद तर, एक मशीन सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनातील आणि शेकापचे नेते आस्वाद पाटील यांच्या दालनाबाहेरील मशीन बंद दिसले, तसेच सामान्य प्रशासनातील मशीन बंद होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या दालनातील मशीन सुरू असल्याचे दिसून आले. दुसºया मजल्यावर ग्रामपंचायत, कृषी विभाग, आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. तेथील तीनपैकी एक मशीन बंद होते, तर दोन सुरू होत्या. तिसºया मजल्यावर तीनपैकी एक मशीन बंद होते, तर दोन सुरू होत्या. चौथ्या मजल्यावरील मशीन सुरू होते.>एकू ण किंमत ९,५०० रुपयेकोरोनाला अटाकाव करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सॅनिटायझर मशीन उपलब्ध करू दिल्या आहेत. त्यांची किंमत सुमारे नऊ हजार ५०० रुपये आहे. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात आले आहे. तेथील संबंधित विभागाने त्या मशीनमध्ये सॅनिटायझर भरणे गरजेचे आहे. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असे बांधकाम विभागातून सांगण्यात आले.