ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करा
By Admin | Updated: November 14, 2016 04:25 IST2016-11-14T04:25:35+5:302016-11-14T04:25:35+5:30
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढत्या ध्वन्ािप्रदूषणाचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आणि ध्वनी नियमन व नियंत्रण नियमातील तरतुदीप्रमाणे

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करा
पोलादपूर : विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढत्या ध्वन्ािप्रदूषणाचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आणि ध्वनी नियमन व नियंत्रण नियमातील तरतुदीप्रमाणे आवाजाची मर्यादा शासनाने अटी व शर्तीनुसार ठरवून दिली असून याबाबत काटेकोर पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते. यासाठी जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलादपूर पोलिसांनी केले आहे.
शांतता झोन दिवसा ५० डेसिबल मर्यादा तर रात्री १० नंतर ४० डेसिबल मर्यादा असून निवास झोन दिवसा ५५ रात्री ४५ डेसिबल, वाणिज्य झोनसाठी ६० डेसिबल, तर रात्री ५५ डेसिबल आणि औद्योगिक झोनसाठी ७५ डेसिबल व रात्री १० नंतर ७० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली असून येणारे प्रत्येक सण, खासगी, सार्वजनिक कार्यक्रम ३१ डिसेंबर या दिवशी होणारे कार्यक्रम अशासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वरीलप्रमाणे मर्यादांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करून जर मर्यादांचे व कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून ५ वर्षे कैदेची सजा व १ लाख रुपये दंडापर्यंत शिक्षा होऊ शकते. जर ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार असल्यास पोलादपूर पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्ष रायगड-अलिबाग ०२१४१-२२२१०० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलादपूर पोलिसांनी जनतेला केले आहे. या वेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र जगदाळे, उपनिरीक्षक अनिल अंधेरे, पो. ह. नाना म्हात्रे, सावंत, पाटील, अमित सावंत, गायकवाड आदी पोलीस कर्मचारी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)