पाच वर्षांच्या अन्वीने गायला शिवरायांच्या प्रराक्रमाचा पोवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:24 IST2019-02-23T00:24:05+5:302019-02-23T00:24:18+5:30

कर्जत नगरपरिषद हद्दीतील नानामास्तरनगर येथील शिवतेज मित्रमंडळ यांनी शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्र मांंचे आयोजन केले

Five year old girl pose for the initiation of Shivrajaya | पाच वर्षांच्या अन्वीने गायला शिवरायांच्या प्रराक्रमाचा पोवाडा

पाच वर्षांच्या अन्वीने गायला शिवरायांच्या प्रराक्रमाचा पोवाडा

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील नानामास्तरनगर येथील शिवतेज मित्रमंडळ यांनी शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्र मांंचे आयोजन केले. याच सोहळ्यात अवघ्या पाच वर्षांच्या अन्वी शिंदे या चिमुकलीने छ. शिवाजी महाराज व अफजलखानाचा वध या विषयावर पोवाडा सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या वेळी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवतेज मित्रमंडळ यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याचबरोबर रक्तदान शिबिरदेखील आयोजित केले. त्यात सुमारे ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी साई ब्लड बँक पनवेल यांच्यामार्फत केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेविका भारती पालकर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Five year old girl pose for the initiation of Shivrajaya

टॅग्स :Raigadरायगड