गारळ येथे अपघातात पाच जण जखमी
By Admin | Updated: October 10, 2016 03:41 IST2016-10-10T03:41:31+5:302016-10-10T03:41:31+5:30
माणगावजवळील गारळ गावानजीक शनिवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडीला अपघात होऊन गाडीतील पाच जण जखमी झाल्याची घटना

गारळ येथे अपघातात पाच जण जखमी
माणगाव : माणगावजवळील गारळ गावानजीक शनिवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडीला अपघात होऊन गाडीतील पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जखमींवर माणगाव उपजिल्हा रुणालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
शनिवार ८ आॅक्टोबर रोजी मुलुंडवरून चालक रमेश खळे (३४) क्वालीस गाडी घेऊन मुंबई -गोवा महामार्गावरून दापोलीकडे निघाले असताना गारळ गावच्या हद्दीत समोरून जात असलेला डंपर हा अचानक रस्त्यात थांबला. क्वालीस गाडीच्या चालकाचे अचानक डंपर थांबल्याने गाडीवर नियंत्रण सुटून डंपरच्या डाव्या बाजूस जोरात गाडी आदळून अपघात झाला. या अपघातात क्वालीसमधून प्रवास करणारे महेंद्र शिगवण, रु पेश तांबे, संतोष शिगवण, संदेश शिगवण, प्रमोद शिगवण सर्व राहाणार दाभीळ तांबेवाडी हे जखमी झाले.
माणगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. फाटक करीत आहेत. (वार्ताहर)