मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात पाच जखमी
By Admin | Updated: May 2, 2017 04:56 IST2017-05-02T04:56:33+5:302017-05-02T04:56:33+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर ढोंबी गावाजवळ तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले. हा

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात पाच जखमी
वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर ढोंबी गावाजवळ तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ढोंबी गावाच्या हद्दीत मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेलरला एक कार ओव्हरटेक करीत असताना बोलीपंचतन येथून नेरूळकडे जाणाऱ्या कारला तिने धडक दिली. मागून येणाऱ्या कारने या कारला धडक दिल्याने कारमधील प्रवासी विश्वास तोडणकर, हर्षदा तोडणकर, वैशाली तोडणकर, तेजल तोडणकर हे जखमी झाले, तर ट्रेलरचालक सुलतान अन्सारी किरकोळ जखमी झाले. या अपघातग्रस्त कारपैकी एका कारमध्ये १ लाख ४८ हजार रुपयांची रोख रक्कम सापडल्याने परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू होती; परंतु या कारचे चालक अनंत वारगुडे (रा. पाली) यांच्या आईला उपचारासाठी पेण येथील रु ग्णालयात दाखल केले होते, तिच्या उपचारासाठी ही रक्कम घेऊन जात होतो; अपघातामुळे घाबरून गेल्याने रोकड गाडीतच ठेवून वडखळ पोलीस ठाण्यात आल्याचे अनंत वारगुडे यांनी सांगितले. (वार्ताहर)