एक्स्प्रेस वेवरील अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:51 IST2019-05-26T05:51:13+5:302019-05-26T05:51:15+5:30

खालापूर हद्दीतून जाणाऱ्या एक्स्प्रेसवेवर शनिवारी वेगवान कार लोखंडी संरक्षक पट्टीवर धडकली.

Five injured in an accident in Expressway | एक्स्प्रेस वेवरील अपघातात पाच जखमी

एक्स्प्रेस वेवरील अपघातात पाच जखमी

मोहोपाडा : खालापूर हद्दीतून जाणाऱ्या एक्स्प्रेसवेवर शनिवारी वेगवान कार लोखंडी संरक्षक पट्टीवर धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई लेनवरून जात असताना खालापूर हद्दीत खरसुंडी गावाजवळ एका कारचा टायर फुटला. त्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटूून लोखंडी संरक्षक पट्टीला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला. तर कारमध्ये बसलेले अश्फाक कादिर शेख (३०), जुनैद अन्सारी (३०), मुस्तफा शेख (३०), शाबाज शेख (३५) व झहिर खान (३०, सर्व रा. कोंढवा, पुणे) गंभीर जखमी झाले. जखमींना कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अश्फाक आणि जुनैदची प्रकृती चिंताजनक आहे.
खालापूर हद्दीत झालेल्या अपघातात कारचा टायर फुटला. तसेच गाडीचा चक्काचूर होऊन तिची अवस्था झाली होती. अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: Five injured in an accident in Expressway