पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका ३१ ऑगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:57 IST2019-08-17T23:57:17+5:302019-08-17T23:57:27+5:30
तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ ऑगस्ट रोजी होणार आहेत. शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका ३१ ऑगस्टला
कर्जत : तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी होणार आहेत. शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
१९ आॅगस्ट रोजी अर्जांची छाननी होणार असून, २१ आॅगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि त्याच दिवशी चिन्हवाटप करण्यात येणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून, ३ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर सहा प्रभागातील १७ जागांसाठी १०० नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली.
उमरोलीत थेट सरपंचपदाच्या जागेसाठी सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर पाच प्रभागातील १३ जागांसाठी ५० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी दिली.
वाकसमध्ये सरपंचपदाच्या एका जागेसाठी सात नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर चार प्रभागातील ११ जागांसाठी ३१ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी सांगितले.
जामरुंगमध्ये सरपंचपदाच्या जागेसाठी तीन नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर तीन प्रभागांत नऊ जागांसाठी २० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.
रजपेमध्ये सरपंचपदासाठी सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर तीन प्रभागांतील सात जागांसाठी २५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.
१९ आॅगस्टला अर्जांची छाननी
पाच ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या जागेसाठी ३५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर पाच ग्रामपंचायतीमधील एकूण ५७ सदस्यांसाठी २२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. १९ आॅगस्ट रोजी छाननी करण्यात येणार असून, २१ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.