फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 8, 2015 00:04 IST2015-10-08T00:04:36+5:302015-10-08T00:04:36+5:30
मुंबई-ठाणे भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी साडेचार लाखांत घर अशी जाहिरात शेलू येथे चाळ बांधणाऱ्या बिल्डरने दिली होती. चाळ स्वरूपातील घर देण्याचे

फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल
नेरळ : मुंबई-ठाणे भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी साडेचार लाखांत घर अशी जाहिरात शेलू येथे चाळ बांधणाऱ्या बिल्डरने दिली होती. चाळ स्वरूपातील घर देण्याचे आमिष दाखवूनही ते न देणाऱ्या बिल्डरवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलू येथे जगदंबानगर येथे बांधकाम करणाऱ्या या बिल्डरने अनेक गरजू लोकांना गंडा घातला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शेलू गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चाळ पद्धतीची घरे बांधली जात आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बिल्डर शेलू भागात पोहचले आहेत. मुंबईमधील झोपडपट्टीमध्ये राहणारे गरजू लोक हक्काचे घर मिळणार म्हणून मोठ्या आशेने शेलू भागात आले. मागील वर्षभरात या भागात हक्काचे घर देण्याचे आश्वासन बिल्डर पूर्ण करु शकले नाहीत. त्यातच आता अनेक गरजू लोक हक्काचे घर मिळाले नाही म्हणून पुढे येत आहेत. त्यातील एक महिला स्नेहल महाडिक यांनी त्याबाबत आता रीतसर तक्र ार नेरळ पोलीस ठाणे येथे केली आहे.
मुंबईमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी करीत असलेल्या महाडिक यांनी शेलू येथील जगदंबा बिल्डरकडे घरासाठी नोंद केली होती. चार लाख रु पये घराची किंमत होती, त्यापैकी साडेतीन लाख आतापर्यंत त्यांनी बिल्डरला दिले आहेत. मात्र आजपर्यंत घर मिळण्याचे कोणतेही चित्र दिसत नसल्याने स्नेहल महाडिक यांनी अखेर नेरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार केली. जगदंबा बिल्डरचे रक्षक रमेश काळे, रवींद्र पंजारात जाचक,नाना एकनाथ आढाव, दुश्यांत काळे अशा चार जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (वार्ताहर)