सोलणपाडातील ‘त्या’ ग्रामस्थांचा सत्कार

By Admin | Updated: August 26, 2015 00:08 IST2015-08-26T00:08:43+5:302015-08-26T00:08:43+5:30

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या जामरु ंग येथील पाझर तलावात एक तरु ण रविवारी बुडला होता. त्या तरु णाला ७० फूट खोल जाऊन बाहेर काढणाऱ्या तिघांना

Felicitates 'those' villagers in Solanpada | सोलणपाडातील ‘त्या’ ग्रामस्थांचा सत्कार

सोलणपाडातील ‘त्या’ ग्रामस्थांचा सत्कार

नेरळ : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या जामरु ंग येथील पाझर तलावात एक तरु ण रविवारी बुडला होता. त्या तरु णाला ७० फूट खोल जाऊन बाहेर काढणाऱ्या तिघांना पोलीस दलातर्फे सन्मानित करण्यात आले.
सोलणपाडा गावाच्या हद्दीत जामरु ंग पाझर तलाव आहे. या तलावाची निर्मिती १९८२ मध्ये जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केली होती. दोन वर्षांपूर्वी या पाझर तलावाची मोठ्या प्रमाणात दुरु स्ती करण्यात आली होती. त्यामुळे पाझर तलावात कुठे खोलगट भाग आहे, कुठे दगडाच्या कपारी आहेत याची पूर्ण कल्पना सोलणपाडा येथील बुजुर्ग लोकांना होती. त्याचा फायदा रविवारी कर्जत पोलिसांना झाला. या परिसरात वर्षासहलीसाठी आलेल्या पुणे येथील तरु णांपैकी २५ वर्षीय राजू तिरुपती बिहिरी हा तरु ण पाझर तलावाच्या पाण्यात उतरला आणि बुडाला. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थ आणि पोहणारे यांनी केलेल्या शोधमोहिमेत पाझर तलावामध्ये ७० फूट खोल त्या तरु णाचा मृतदेह सापडला. त्या तरु णाचा मृतदेह सोलणपाडा गावातील भगवान बांगर, दत्तात्रय सावंत, शिवाजी थरकुडे यांनी पाझर तलावात खोलवर जाऊन बाहेर काढला.
त्यांची ही सामाजिक बांधिलकी आणि पोलिसांना मृतदेह शोधण्यासाठी झालेली मदत लक्षात घेऊन त्या प्रमुख तीन व्यक्तींचा सत्कार कर्जत येथे पोलिसांनी केला. जिल्हा पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील यांच्या हस्ते तिघांचा सत्कार रायगड पोलिसांच्या वतीने केला. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश भोसले, टेंबरे ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश सावंत, ग्रामस्थ शिवाजी बिबवे, अरु ण घाग आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

पोलिसांना केली मदत : पाझर तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना मदत करणाऱ्या सोलणपाडा गावातील भगवान बांगर, दत्तात्रय सावंत, शिवाजी थरकुडे यांचा पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील यांच्या हस्ते सत्कार रायगड पोलिसांच्या वतीने करण्यात आला.

Web Title: Felicitates 'those' villagers in Solanpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.