माणगावात शिक्षकांचे आजपासून उपोषण

By Admin | Updated: October 13, 2016 04:01 IST2016-10-13T04:01:51+5:302016-10-13T04:01:51+5:30

न्यू इंग्लिश स्कूल बामणोलीच्या मुख्याध्यापकाविरोधात कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गुरुवारपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिल्याने सर्वत्र

Fasting from today's teachers in Mangaon | माणगावात शिक्षकांचे आजपासून उपोषण

माणगावात शिक्षकांचे आजपासून उपोषण

माणगाव : न्यू इंग्लिश स्कूल बामणोलीच्या मुख्याध्यापकाविरोधात कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गुरुवारपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
माणगाव तालुक्यातील श्री संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल बामणोली या संस्थेच्या मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरुध्द कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी तक्रार केल्यानंतर वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी २९ मेपासून शाळेवर प्रशासक नेमला होता. प्रशासकाचा कालावधी संपल्यानंतर विश्वस्त मंडळाची निवडणूक न झाल्याने कोणीही पदाधिकारी नाहीत त्यामुळे संपूर्ण कारभार फक्त मुख्याध्यापक पहात आहेत. याकडे शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण प्रक्रि येशी संबंधित सर्व कार्यालये दुर्लक्ष करीत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करु न दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरु वारपासून शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)

Web Title: Fasting from today's teachers in Mangaon