मोबदल्यासाठी शेतकऱ्याचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:49 IST2018-10-25T23:49:43+5:302018-10-25T23:49:47+5:30
उसर येथील गेल प्रकल्पासाठी मल्याण, उसर, कुणे, परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या.

मोबदल्यासाठी शेतकऱ्याचा संताप
अलिबाग : तालुक्यातील उसर येथील गेल प्रकल्पासाठी मल्याण, उसर, कुणे, परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. काही शेतकºयांनी वाढीव मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा फेºया मारल्या; परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या वयोवृद्ध शेतकºयाने आक्रमक शैलीत जिल्हा प्रशासानाचे वाभाडे काढले.
रामचंद्र दळवी असे त्या शेतकºयाचे नाव आहे. उसर येथील गेल प्रकल्पामध्ये टप्पा-१ साठी शेतकºयांच्या जमिनी एमआयडीसी भूसंपादन कायद्यानुसार संपादित केल्या होत्या. शेकडो शेतकºयांच्या हजारो एकर जमिनी प्रकल्पामध्ये गेल्या आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हे शेतकरी वाढीव मोबदला मिळण्यासाठी लढत
आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असता, शेतकºयांनी मागितलेल्या वाढीव मोबदल्याच्या विरोधात एमआयडीसीने न्यायालयात अपिल दाखल केले असून, प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याने जिल्हा प्रशासन काहीच करू शकत नाही.