महानगर गॅसचे मीटर बसवताना घरात स्फोट, पाच जखमी
By वैभव गायकर | Updated: February 15, 2023 00:02 IST2023-02-15T00:02:12+5:302023-02-15T00:02:48+5:30
पनवेल - कामोठे सेक्टर 6 अ च्या एका इमारतीत महानगर गॅसचे कर्मचारी घरात मीटर बसविण्यासाठी आले असताना दि.14 रोजी सायंकाळी ...

महानगर गॅसचे मीटर बसवताना घरात स्फोट, पाच जखमी
पनवेल - कामोठे सेक्टर 6 अ च्या एका इमारतीत महानगर गॅसचे कर्मचारी घरात मीटर बसविण्यासाठी आले असताना दि.14 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास स्फोट झाला. या घटनेत महानगरचे 2 कामगार, घरातील एक महिला, 9 महिन्याचे बाळ, घरात उपस्थित असलेले आणखी एक इसम जखमी झाले आहेत.
पूनम ओव्हाळ (24),विहान ओव्हाळ (9 महिने),सुमित चंदनशिवे (28) अशी जखमींची नावे आहेत. महानगर गॅसच्या वतीने नुकतीच नव्याने गॅस लाईन टाकण्यात आली होती. त्या लाईनचे कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. मात्र महानगर गॅस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून महानगर गॅस प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवासी अक्षय ओव्हाळ यांनी केली आहे. या अपघातात घरातील इलेक्ट्रॉनिक तसेच इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.