शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

महागड्या अशुद्ध पाण्याचा माथेरानला होतोय पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:47 AM

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया; शार्लेट तलाव, नेरळ येथील उल्हास नदीतून केला जातो पाणीपुरवठा

मुकुंद रांजणेलाेकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरानकरांच्यामागील पाण्याचे शुक्लकाष्ठ सुटण्याचे नाव घेत नसून पालिकेकडून वारंवार सूचना देऊनही माथेरानकरांना रोजचा सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, अनेक वेळा गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.              माथेरानकरिता येथील शार्लेट तलाव व नेरळ येथून उल्हास नदीचे पाणी जलवाहिनीद्वारे घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. येथील शार्लेट तलावाची पाणीसाठवण क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे माथेरानकरांना नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. येथून खेचले जाणारे पाणी नेरळ-माथेरान घाटातील जुमापट्टी, वॉटरपाइप या पंपस्टेशनद्वारे माथेरानमधील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविले जाते. घाटातील दोन पंपिंग स्टेशन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. येथून पाणीपुरवठा सुरळीत झाला, तर माथेरानकरांना रोज पाणी मिळते. पण, येथेच नेहमी काही ना काही गडबड होत असून माथेरानचे पर्यटन लक्षात घेता माथेरानला रोज १२ तासांहून अधिक वेळ पंपिंग झालेच पाहिजे, पण प्रत्यक्षात सरासरी  सात ते आठ तासच पंपिंग होत असल्याने माथेरानमधील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर, घाटातील पंपिंग बिघडल्यास काही भागांना पाणीपुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नेरळमधील पाणी बंद झाल्यास माथेरानमधील शार्लेट तलावाचे पाणी वापरले जात आहे व वारंवार हे पाणी वापरले गेल्याने तलावाची पाण्याची पातळी खूपच खाली गेली असून मे महिन्याच्या पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना पाणीटंचाईस तर सामोरे जावे लागणार नाही ना, अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. माथेरानच्या शार्लेट लेक येथील पाणी शहरास वाटप होत असताना त्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याचे आढळून येत आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्र हे ब्रिटिशकालीन असून त्याच्या क्षमतेच्या दुप्पट पाणी सध्या माथेरानकरांना लागत आहे. त्यामुळे पुरेसे शुद्ध पाणी माथेरानकरांना उपलब्ध होत नाही.  ४६ कोटी रुपयांची माथेरानकरिता नवीन पाणीयोजना व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वापरण्यात आले. पण, या जलशुद्धीकरण केंद्राचे काम  निकृष्ट झाले असून उद्घाटनापूर्वीच येथे बनविण्यात आलेल्या टाक्यांना गळती लागल्यापासून त्याच्या उद्घाटनास मुहूर्तच सापडलेला नाही. कोणीही अधिकारी या इमारती ताब्यात घेऊन हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. माथेरानमधील स्थानिकांनी अनेकवेळा या ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करूनही त्यास अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद लाभलेला नाही.पंपिंग स्टेशनकडे प्राधिकरणाचे दुर्लक्षnमाथेरान पर्यटन नगरीस येथील शार्लेट लेक येथून पाणीपुरवठा होत असतो, पण मागील काही वर्षांमध्ये येथे झपाट्याने पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने हे पाणी कमी पडू लागले होते. त्याकरिता नेरळ येथील उल्हास नदीचे पाणी पंपांद्वारे माथेरानपर्यंत नेरळहून पाणीटंचाईवर मात करण्यात आली, पण हे पाणी नेताना माथेरान येथील शार्लेट लेक येथील पंपिंग स्टेशनकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. nपूर्वी येथे वीज नसली तरी जनरेटरच्या साहाय्याने पाणी पंपिंग करून सर्वत्र वितरित केले जात होते, पण नेरळहून येणारे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येऊ लागल्याने शार्लेट लेक येथील कार्यालय बंद पडू लागले. nत्याच्यामुळे येथे असलेली यंत्रसामग्री व जनरेटरच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने येथील सुविधा हळूहळू बंद होऊ लागल्या, ज्याचे विपरित परिणाम आता माथेरानकरांना भोगावे लागत आहेत. नेरळ येथील पाणीपुरवठा खंडित झाल्यास व शार्लेट लेक येथील वीज अनियमित झाल्यास माथेरानकरांना पिण्याच्या पाण्यास मुकावे लागते.  nमाथेरानमध्ये व्यावसायिक व घरगुती अशा जवळपास १३०० नळजोडण्या आहेत. त्याचे मासिक उत्पन्न सरासरी २० लाखांच्या आसपास होते, म्हणजे जोडण्याच्या हिशेबाने येथे उत्पन्न जास्त आहे. nनेरळ ते माथेरानदरम्यान असलेले मोठे पंपिंग स्टेशन व त्याला लागणारी वीज याच्या देयकांची रक्कम १२ लाखांच्या आसपास आहे. यामुळेच ही पाणीयोजना माथेरानकरांना महाग ठरत आहे.

माथेरानकरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा नियमित व्हावा, याकरिता माथेरान पालिका जल प्राधिकरणाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून काही तांत्रिक अडचणी सोडवून समस्त माथेरानकरांना लवकरच सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच कोरोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत मिळविण्याची बोलणी जलसंपदामंत्री यांच्याबरोबर अंतिम टप्प्यात असून हाही प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. - प्रेरणा सावंत,  नगराध्यक्षा, माथेरान 

माथेरानकरांना पाणीबिलांमध्ये सवलत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी आम्ही पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केली असून एक वर्षाचा काळ लोटून गेल्यानंतरसुद्धा आमची मागणी अजून पूर्ण झाली नाही. - शिवाजी शिंदे, विरोधी पक्षनेते, नगरसेवक माथेरान 

माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आपल्या दालनामध्ये जल  प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून माथेरानला होणारा पाणीपुरवठा अखंडित व्हावा, याकरिता तंबी देऊनही मागील काही दिवसांमध्ये माथेरांकरांना दूषित पाणीपुरवठा केला गेला, त्यामुळे हे अधिकारी माथेरानच्या पाणीपुरवठ्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेच दिसून येत आहे.