नारळीपौर्णिमेनिमित्त कोळीवाड्यात उत्साह
By Admin | Updated: August 29, 2015 22:15 IST2015-08-29T22:15:12+5:302015-08-29T22:15:12+5:30
‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती. कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता.

नारळीपौर्णिमेनिमित्त कोळीवाड्यात उत्साह
रेवदंडा : ‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती.
कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता. घरोघरी गोडधोड पदार्थ नारळाच्या पुरणांचा (करंज्या) आदी बेत पाहुण्यांसाठी दिसत होता. ध्वनिक्षेपकावर पारंपरिक गीतांच्या ठेक्यावर अनेक ठिकाणी कोळी नृत्यही रंगली होती. सायंकाळी सर्वच कोळीवाड्यांमधून पारंपरिक पध्दतीने सोन्याचा मुलामा दिलेल्या नारळाची वाजत गाजत मिरवणूका किनाऱ्यापर्यंत काढण्यात आल्या होत्या. सकाळी किनाऱ्यावर मच्छिमारी नौकांची पूजा - अर्चा करण्यात कोळी बांधव मग्न दिसत होते. कोळी महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा केल्याने मिरवणूकीला रंगत आली. अनेक ठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा झाल्या त्याला नागरिकांनी गर्दी केली होती.
महाडमधील रोटरी क्लबच्या वतीने शनिवारी राजिप गांधारपाले शाळेमध्ये वृक्षारोपणाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन अभिनव पध्दतीने करण्यात आले. सकाळी गांधारपाले राजिप. शाळेमध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलेल्या झाडांना राखी बांधून सण साजरा केला.