मृतदेहाची अदलाबदली अधिकाऱ्यांना भोवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:09 AM2020-06-01T00:09:09+5:302020-06-01T00:09:26+5:30

आयुक्तांनी बजावली नोटीस : चौकशी अहवालातून हलगर्जी उघड

Exchanging bodies will bother officials! | मृतदेहाची अदलाबदली अधिकाऱ्यांना भोवणार!

मृतदेहाची अदलाबदली अधिकाऱ्यांना भोवणार!

googlenewsNext

नवी मुंबई : रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल होऊन मुस्लीम तरुणावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार झाल्याचे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये घटनेला कारणीभूत बाबींचा उलगडा झाल्याने संबंधितांवर कारवाईचे संकेत देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


वाशी येथील पालिका रुग्णालयाच्या शवागारातून हा प्रकार घडला होता. दिघा येथील काजल सूर्यवंशी व उलवे येथील उमर शेख यांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले होते. दोघांचाही मृत्यू कोरोनासदृश आजाराने झाल्याने चाचणीसाठी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु १५ मे रोजी दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांना कळवले होते. कालजला मृतदेह तिच्या वडिलांनी ताब्यात घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार केले. तर चार दिवसांनी उमर शेखचे नातेवाईक त्याचा मृतदेह घेण्यासाठी आले असता मृतदेह सापडला नाही. उमर एकटाच उलवे येथे राहायला होता. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पश्चिम बंगाल येथून त्याचे नातेवाईक आले होते. परंतु शवागारात उमरचा मृतदेह सापडत नसल्याने खळबळ उडाली. अखेर दोन दिवसांनी मृतदेहाची अदलाबदल होऊन काजलच्या ऐवजी उमरचा मृतदेह देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे उमरच्या नातेवाइकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली असता, पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांनी घटनेशी संबंधित सर्वांची चौकशी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रुग्णालयातील तिघा अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
घटनेप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झालेला आहे. तशी मागणी उमरच्या नातेवाइकांनी लावून धरली होती. त्यामुळे संबंधितांनी पालिका आयुक्तांना दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्यांना प्रशासकीय कारवाईसह पोलिसांच्यादेखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


‘तो’ व्हिडीओ ठरला महत्त्वाचा
च्मृतदेह गहाळ झाल्यानंतर शोधाशोध सुरू असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काजल व उमर यांचे मृतदेह शवागारात एकाच पेटीत ठेवत असताना संबंधिताने माहितीस्तव हा व्हिडीओ काढला होता.
च्तो व्हिडीओ समोर आल्यानंतर शवागारात निष्काळजीपणाच्या अनेक बाबी समोर आल्या. तसेच शवागारात १८ पेट्या असताना त्या ठिकाणी ३२ मृतदेह ठेवल्याचीही बाब समोर आली.
१रुग्णालयाच्या शवागारात पालिका हद्दीबाहेरील मृतदेह न ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यानंतरही उलवेत राहणारा उमर शेख याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. तर शवागारात जागा अपुरी असल्याने काजल व उमर यांचे मृतदेह एकाच रॅकमध्ये ठेवले होते.
२त्या वेळी काजलच्या मृतदेहाची ओळख पटवणारे लेबलही आढळले नाही. त्यामुळेच मृतदेहाची अदलाबदल होऊन गंभीर घटना घडल्याचा ठपका पालिका आयुक्तांनी लावला आहे. यामुळे शवागार प्रशासन व दोन डॉक्टरांना शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Exchanging bodies will bother officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.