अखेर बांधकाम अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 29, 2016 02:14 IST2016-10-29T02:14:32+5:302016-10-29T02:14:32+5:30
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अखेर बांधकाम अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
अलिबाग : रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काँग्रेसचे अॅड. प्रवीण ठाकूर यांच्या तक्रारीला पोलिसांनी केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे ठाकूर यांनी थेट जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ठाकूर यांची बाजू ग्राह्य धरत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अलिबाग पोलिसांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबागचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, उपअभियंता व्ही. जी. देशपांडे, कनिष्ठ अभियंता प्रकाश शेडेकर, कनिष्ठ अभियंता बी. आर. चव्हाण, कनिष्ठ अभियंता राहुल कुडतरकर यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर ठेकेदारांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)