शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तेज बुद्धीची अपेक्षा घर सोडून गेली, पोलिसांनी 6 तासात शोधले; पालकांच्या स्वाधीन

By राजेश भोस्तेकर | Updated: November 19, 2022 19:07 IST

अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यानगर येथे योगिता अरुण मारभळ हे कुटुंब राहत आहे

अलिबाग : बुद्धिबळ खेळात तरबेज असताना अभ्यासात मात्र कमी असल्याने नैराश्य येऊन सुसाईड करण्याच्या उद्देशाने घर सोडून गेलेली अलिबागची अपेक्षा मारभळ (वय १३ वर्ष) हिला अलिबाग पोलिसांनी त्वरित यंत्रणा लावून तिचा शोध घेऊन सुखरूप आपल्या पालकांच्या स्वाधीन केली आहे. आई-वडीलासह व तिच्या शाळेतील वर्ग शिक्षिका यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन या घटनेच्या अनुषंगाने तिचे व त्यांचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगितले.

अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यानगर येथे योगिता अरुण मारभळ हे कुटुंब राहत आहे. अपेक्षा मारभळ ही त्याची मुलगी असून बुद्धिबळ खेळात ती तरबेज आहे. मात्र अभ्यासात तिची प्रगती खूपच कमी असल्याने शिक्षकाकडून आणि पालकांकडून तिला बोलले जात होते. त्यामुळे या लहान वयात अपेक्षा ही नैराश्यात गेली होती. अखेर आपले जीवन संपविण्याचा निर्णय अपेक्षाने घेऊन शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी सुसाईड नोट लिहून सायंकाळी सहा वाजता घर सोडून निघून गेली. मुलगी सुसाईड नोट लिहून गेल्याचे कळल्यावर मारभळ कुटुंबांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शैलेश सणस याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रेयजाधव, पोसई अभिजित पाटील, मपोह जोस्ना मासे, पोना प्रगती खिचडे, पोशी हर्षल पाटील, पोना अनिल पाटील व मपोशी बुखारी यांची ०२ शोध पथके तयार केली. पेण, रोहा, पनवेल रेल्वे स्टेशन येथे संपर्क साधून सदर मुलीचे फोटो व माहिती पाठवून फोनद्वारे कल्पना देण्यात आली.  

सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा रक्षक दल अलिबाग व वरसोली येथील कोळीवाड्यातील पोलीस मित्र यांना सदरची माहिती शेअर करण्यात येऊन आपआपल्या हद्दीत शोध घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे या शोध पथकांना अलिबाग, वरसोली, किहीम बीच, चोंढी, झिराड, मांडवा परिसरात पाठवून शोध घेण्यात आला.  रात्रौ २२.५० वाजण्याचे दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे येथून पोलीस अंमलदार देवेन म्हात्रे यांनी फोनवरून नमूद वर्णनाची मुलगी पनवेल एस. टी. स्टॅन्ड येथे मिळून आल्याचे कळविले. ही माहिती मिळताच पथक पाठवून अपेक्षा हिला सुखरूप पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसalibaugअलिबाग