अतिक्रमण जमीनदोस्त

By Admin | Updated: August 22, 2015 21:47 IST2015-08-22T21:47:14+5:302015-08-22T21:47:14+5:30

उरण नगरपरिषदेच्या हद्दीत रस्त्यावर उभारण्यात आलेले दुकानांसमोरील बेकायदा बांधकाम, पत्र्याचे शेड नगरपरिषदेने शनिवारी अडवले.

Encroachment racket | अतिक्रमण जमीनदोस्त

अतिक्रमण जमीनदोस्त

उरण : उरण नगरपरिषदेच्या हद्दीत रस्त्यावर उभारण्यात आलेले दुकानांसमोरील बेकायदा बांधकाम, पत्र्याचे शेड नगरपरिषदेने शनिवारी अडवले.
उरण नगरपरिषदेच्या रस्त्यावर व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. याची दखल नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी, अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावून बांधकाम तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेतर्फे काही ठिकाणची अतिक्रमणे तोडली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील कारवाईच्या नोटिसा व्यापाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगरपरिषदेने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण तोडले.

Web Title: Encroachment racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.