शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गांजा विक्री करणाऱ्या तीन टोळ्यातील आठ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:09 IST

जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे.

अलिबाग : जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे. विविध ठिकाणी गांजा विक्री करणाºया तीन टोळ्यांतील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ लाखांचा तब्बल ९२ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तीन कार ताब्यात घेण्यात आल्याची माहिती रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.कर्जत परिसरात राहणारे आवदेश वर्मा व मुनीलाल राजभर हे गांजाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार जमिल शेख यांनी, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्यावर जबाबदारी सोपवत विशेष पथकाची स्थापना केली आणि २५ फेब्रुवारी रोजी पळसदरी फाटा हद्दीत सापळा रचला होता. या वेळी स्वीफ्ट कारने आलेल्या आवदेश चंद्रशेखर वर्मा, (३१ वर्षे, रा. कर्जत), मुनीलाल ललकारी राजभर, (२५ वर्षे, कर्जत, मूळ उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १५ किलो ५०० ग्रॅम वजनाचा सुमारे एक लाख ८६ हजार रु पये किमतीचा गांजा या अमली पदार्थांचा साठा सापडला. त्यानंतर अधिक चौकशीत या दोघांनी ज्याच्याकडून गांजा मिळवला त्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातून इफ्तिकार निसार शेख, (३६ वर्षे, नाशिक) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३४ किलो २०० ग्रॅम, सुमारे चार लाख, दहा हजार ४० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४९ किलो ७०० ग्र्रॅम वजनाचा सुमारे पाच लाख ९६ हजार ४० रुपये किमतीचा गांजा, तसेच त्याची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात येणारी आठ लाख रु पये किमतीची कार हस्तगत केली आहे.त्याचप्रमाणे ७ फेब्रुवारी २०२० रोजी खालापूर येथे सापळा लावून राजू विठ्ठल चव्हाण (रा. उंबरवाडी-पाली, ता. सुधागड, जि.रायगड), दिलीप नारायण साळुंखे (रा. उंबरवाडी-पाली, जि. रायगड), बाळू दत्तोबा चव्हाण (रा. पाटस-पुसेगाव, जि. पुणे), रमेश दत्तोबा चव्हाण (रा. पाटस-पुसेगाव, जि. पुणे), सचिन भगवान साळुंखे(रा. ठोंबरेवाडी-लोणावळा) या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३१ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा आणि दोन टाटा इंडिका कार असा एकूण चार लाख ७३ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.>नागरिकांना सतर्कतेचे आवाहनपरिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गावठी दारू, गांजा, चरस यासह अन्य अमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांबाबत माहिती असल्यास तत्काळ त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला अगर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन रायगड पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.