रायगड जिल्ह्यात आठ कुपोषित बालके
By Admin | Updated: October 23, 2016 01:39 IST2016-10-23T01:39:19+5:302016-10-23T01:39:19+5:30
तालुक्यातील वेणगाव परिसरातील चार आदिवासी वाड्यांमध्ये आठ कुपोषित बालके आढळून आल्याने महिला व बालकल्याण यंत्रणेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रायगड जिल्ह्यात आठ कुपोषित बालके
कर्जत (रायगड) : तालुक्यातील वेणगाव परिसरातील चार आदिवासी वाड्यांमध्ये आठ कुपोषित बालके आढळून आल्याने महिला व बालकल्याण यंत्रणेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य व महिला बालकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीत तातडीने बदल करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी क्रांती संघटनेचे कमल वाघमारे यांनी केली आहे. वेणगाव ग्रामपंचायतीमधील वडाची वाडी, चिंचेची वाडी, मधली वाडी, खालची वाडी येथील अंगणवाडीत कुपोषित बालके आढळली आहेत. येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून एकच महिला कार्यरत आहे. आठ कुपोषित बालकांमध्ये वाघमारे कुटुंबातील सहा आणि अन्य कुटुंबातील दोन बालकांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)