शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अलिबाग शहरामध्ये आठ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:43 AM

आंदोलनानंतरही खेळखंडोबा सुरूच; दुरुस्तीसाठी भारनियमन केल्याचा दावा

अलिबाग : महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करून २४ तास उलटले नसतानाच सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी अलिबागमधीलवीजपुरवठा तब्बल आठ तासांसाठी खंडित करण्यात आला. वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, शिवाय व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अलिबाग सब स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी आठ तासांचे भारनियमन घेण्यात आले आहे आणि हे शेवटचे भारनियमन असेल, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी दर मंगळवारी महावितरणकडून भारनियमन केले जायचे. या कालावधीत दुरुस्तीची सर्व कामे करण्यात आली. यात वीजवाहक तारा बदलणे, गंजलेले खांब बदलणे, डीपीची दुरुस्ती करणे यासह अन्य तांत्रिक कामांचा समावेश होतो. दर मंगळवारी दुरुस्तीच्या नावावर भारनियमन घेतले जात असेल तर दुरुस्तीची कामे सातत्याने का केली जातात असा प्रश्न आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या माध्यमातून सोमवारी महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. पुढील काही दिवसात विजेची समस्या उद्भवणार नाही, अशी हमी महावितरणने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिली. मात्र, शिवसेनेने आंदोलन करून २४ तास उलटत नाहीत तोच महावितरणने मंगळवारी आठ तासांचे भारनियमन घेतले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागला.अलिबाग सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने तातडीचे आणि शेवटचे भारनियमन घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल.- विशाल सूर्यवंशी, अधिकारी, महावितरणसध्या पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर धरला आहे. शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असते. बँकेतून कर्ज काढण्यासाठी सात-बारा उताºयाची आवश्यकता असते; परंतु वीजच गायब असल्याने आॅनलाइन सात-बारा उतारा मिळणे कठीण झाले आहे.- शैलेश काशिनाथ पाटील, शेतकरी, अलिबाग

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग