वडखळ-नागोठणे मार्गावरील रस्त्याच्या कामात दिरंगाई

By Admin | Updated: July 17, 2015 22:31 IST2015-07-17T22:31:38+5:302015-07-17T22:31:38+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळ मार्गावरील खड्डे बुजविले असले तरी वडखळ ते नागोठणे महामार्गावरील काही ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई

Duration of road work on the Vaadkhal-Nagastane Road | वडखळ-नागोठणे मार्गावरील रस्त्याच्या कामात दिरंगाई

वडखळ-नागोठणे मार्गावरील रस्त्याच्या कामात दिरंगाई

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळ मार्गावरील खड्डे बुजविले असले तरी वडखळ ते नागोठणे महामार्गावरील काही ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी खड्डे जसेच्या तसे असल्याने वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ३१ जुलैपर्यंत बुजविण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खड्डे बुजविण्याचे काम कासवगतीने सुरू असून काही ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. वडखळ ते नागोठणे मार्गावरील काही ठिकाणचे खड्डे तसेच असल्याने वाहनचालकांना व प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Duration of road work on the Vaadkhal-Nagastane Road