एसटी स्थानक परिसरात कोंडी
By Admin | Updated: February 22, 2016 00:45 IST2016-02-22T00:45:34+5:302016-02-22T00:45:34+5:30
म्हसळा एसटी स्थानकातून लांब पल्ल्याच्या ११४ तर लोकल १७२ अशा एसटीच्या एकूण २८६ फेऱ्या होतात. बस स्थानकाला लागून दिघी नाका आहे, तेथे देखील एसटी उभ्या केल्या जातात.

एसटी स्थानक परिसरात कोंडी
म्हसळा : म्हसळा एसटी स्थानकातून लांब पल्ल्याच्या ११४ तर लोकल १७२ अशा एसटीच्या एकूण २८६ फेऱ्या होतात. बस स्थानकाला लागून दिघी नाका आहे, तेथे देखील एसटी उभ्या केल्या जातात. बस स्थानकाला अपुरी जागा, अरु ंद रस्ता व एसटीच्या फेऱ्या अधिक यामुळे दिवसातून अनेक वेळा बस स्थानक व दिघीनाका येथे साधी दुचाकी जाण्याएवढी जागा शिल्लक नसते. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासी व नागरिकांना अडकून पडावे लागत आहे.
माणगांव - श्रीवर्धन आणि माणगांव - दिघी राज्य मार्गाचा संगम म्हसळा बस स्थानक व दिघी नाका येथे होतो. यामुळे शेकडो एसटीच्या फेऱ्या, दिघी पोर्टची असंख्य अवजड वाहतूक करणारी वाहने, मालवाहू ट्रक, चारचाकी, रिक्षा, मिनीडोर, दुचाकी, टेम्पो, पर्यटकांची शेकडो वाहने यामुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून हे ठिकाण कोंडीचे केंद्रबिंदू बनले आहे. वाहनांची संख्या वाढली, मात्र रस्त्यांचे रुंदीकरण काही झाले नाही, यामुळे ही जागा अपुरी पडत असून दिवसातून सात ते आठ वेळा वाहतूककोंडी या परिसरात होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
बाजारपेठ, दिघी रोड, सोनार आळी, एसटी स्टँड, पोलीस ठाणे, साने मोहल्ला येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. या बेताल वाहतुकीमुळे शहरात वाहनांच्या रांगा लागत आहेत.
(वार्ताहर)
म्हसळा येथून जाणारे वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. रस्ता अरु ंद असल्याने बेशिस्तीने वाहन चालविणाऱ्यांमुळे ही वाहतूक कोंडी होते.
-व्ही. डी. साळुंखे, एस.टी.चालक