अन्नातून विषबाधेमुळे रोह्यात महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: February 15, 2017 03:13 IST2017-02-15T03:13:59+5:302017-02-15T03:13:59+5:30

शहराला लागून असलेल्या खारी गावातील धुमाळ कुटुंबास सोमवारी रात्री घरातील जेवणातूनच विषबाधा झाली. यात एकाचा मृत्यू

Due to poisoning, the death of woman in Roha due to poisoning | अन्नातून विषबाधेमुळे रोह्यात महिलेचा मृत्यू

अन्नातून विषबाधेमुळे रोह्यात महिलेचा मृत्यू

रोहा : शहराला लागून असलेल्या खारी गावातील धुमाळ कुटुंबास सोमवारी रात्री घरातील जेवणातूनच विषबाधा झाली. यात एकाचा मृत्यू झाला, तर पाच जणांना कळंबोली येथील रु ग्णालयात दाखल केले आहे. या पाचही जणांची प्रकृ ती स्थिरअसल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली आहे.
रोहा तालुक्यातील मूळ यशवंतखार गावातील असलेले यदुराम धुमाळ हे खारी गावात राहतात. सोमवारी रात्री घरातील जेवणातूनच धुमाळ कुटुंबास विषबाधा झाली. यामध्ये यदुराम धुमाळ यांची आई, पत्नी, दोन लहान मुले आणि सासूबाई यांचा सामावेश आहे. रोहा येथील जाधव निर्सगहोम येथे प्राथमिक उपचार व तपासणी करून धुमाळ कुटुंबीयांना तातडीने अधिक उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रु ग्णालयात पाठविण्यात आले. त्यांना नेण्यात येत असताना वाटेत पालीनजीक धुमाळ यांच्या मातोश्री भीमाबाई धुमाळ यांचा मृत्यू झाला, मंगळवारी सकाळी यशवंतखार या त्यांच्या मूळ गावी भीमाबाई धुमाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कळंबोली येथील रु ग्णालयात दाखल केलेले धुमाळ व इतर चार जणांची प्रकृ ती स्थिरआहे. रोहा पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to poisoning, the death of woman in Roha due to poisoning