खुल्या डीपीमुळे अपघाताचा धोका; उरण-कामठामधील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:37 IST2019-02-10T23:37:06+5:302019-02-10T23:37:21+5:30
उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील कामठा भागात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची डीपी खुली आहे. तिला दरवाजा नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणकडून डीपीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

खुल्या डीपीमुळे अपघाताचा धोका; उरण-कामठामधील स्थिती
उरण : उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील कामठा भागात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची डीपी खुली आहे. तिला दरवाजा नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणकडून डीपीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून डीपीवरील झाकण नसल्याचे अनेक वेळा वीज अभियंत्यांना नागरिकांनी कळविले आहे. परंतु नागरिकांच्या तक्रारीकडे उरण येथील वीज अभियंते व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. उघड्या डीपीमुळे अपघात घडून मोठी जीवितहानी होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. परिसरात अनेक रहिवासी संकुले असून लहान मुले खेळत असतात. त्यामुळे या समस्येकडे वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष देऊन डीपीवर दरवाजा लावावेत, अशी मागणी कामठा येथील नागरिकांनी केली आहे.