जिते उपसरपंचपदी दिलीप घरत
By Admin | Updated: June 25, 2016 01:56 IST2016-06-25T01:56:03+5:302016-06-25T01:56:03+5:30
कर्जत तालुक्यातील जिते ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदावर शुक्रवारी दिलीप घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

जिते उपसरपंचपदी दिलीप घरत
कर्जत/ नेरळ : कर्जत तालुक्यातील जिते ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदावर शुक्रवारी दिलीप घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.
काशिनाथ मिरकुटे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच शारदा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपसरपंचपदासाठी दिलीप घरत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच गायकवाड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी झालेल्या विशेष सभेला सदस्य ज्योती जाधव, अर्चना भोईर, वैशाली जाधव, काशिनाथ मिरकुटे, दिलीप घरत आणि शारदा गायकवाड या उपस्थित होत्या. निवडणुकीसाठी सरपंच गायकवाड यांना ग्रामसेवक टावरे यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित उपसरपंच घरत यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष संतोष भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)