महाडमध्ये चारमजली इमारतीवर मद्यपीचा शोलेस्टाईल धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 00:58 IST2020-08-31T00:57:40+5:302020-08-31T00:58:28+5:30
पोलीस आणि नागरिक त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांच्या नावाने हा मद्यपी शिव्यांची लाखोली वाहत होता. त्याला वाचविण्यासाठी खाली उतरवायला जाणाऱ्यांवरच हा मद्यपी दगड, विटांचा मारा करीत होता. त्यामुळे मोठी पंचाईत झाली होती.

महाडमध्ये चारमजली इमारतीवर मद्यपीचा शोलेस्टाईल धिंगाणा
महाड : शहरात पोलीस ठाण्याच्या शेजारील चारमजली इमारतीच्या छतावर उभा राहून एका मद्यपीने अक्षरश: तीन तास शोलेस्टाईल धिंगाणा घातला. विशेष म्हणजे, मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्याचा धिंगाणा सुरूच होता.
पोलीस आणि नागरिक त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांच्या नावाने हा मद्यपी शिव्यांची लाखोली वाहत होता. त्याला वाचविण्यासाठी खाली उतरवायला जाणाऱ्यांवरच हा मद्यपी दगड, विटांचा मारा करीत होता. त्यामुळे मोठी पंचाईत झाली होती. अखेर एका तरुणाने हा धोका पत्करला आणि त्याला वर छपरावर जाऊन मागून पकडले. जिन्यावरून त्याला खाली फरफटत आणले. तब्बल तीन तासांनंतर पोलीस आणि उपस्थित नागरिकांनी शेवटी सुटकेचा नि:श्वास सोडला. विजय भालेकर असे या धिंगाणा घालणाºया मद्यपीचे नाव असून, तो किंजळोली भालेकर कोंड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर शहरात सर्वत्र या शोलेस्टाईल धिंगाण्याची चर्चा चांगलीच रंगली होती.