पूर्वीच्या आरक्षणावर मुरु डमध्ये सोडत

By Admin | Updated: October 25, 2016 03:48 IST2016-10-25T03:48:18+5:302016-10-25T03:48:18+5:30

पंचायत समितीचे आरक्षण दरबार हॉल येथील भव्य सभागृहात काढण्यात आले. जिल्हापुरवठा अधिकारी प्रमोद दुपारे यांच्या मुख्य उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

Drop in the Muru Dunk for the earlier reservation | पूर्वीच्या आरक्षणावर मुरु डमध्ये सोडत

पूर्वीच्या आरक्षणावर मुरु डमध्ये सोडत

नांदगाव/ मुरु ड : पंचायत समितीचे आरक्षण दरबार हॉल येथील भव्य सभागृहात काढण्यात आले. जिल्हापुरवठा अधिकारी प्रमोद दुपारे यांच्या मुख्य उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार योगिता कोल्हे, नायब तहसीलदार दिलीप यादव व सर्व पक्षाची प्रमुख मंडळी उपस्थित होती. सन २००२, २००७ व २०१२ चे आरक्षण विचारात घेऊन हे आरक्षण काढण्यात आले.
महाराष्ट्र शासनाकडून पंचायत समितीचे एक आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आरक्षणात फक्त तीन उमेदवारांचे आरक्षण काढण्यात आले. ७९ उसरोळी पडलेले आरक्षण सर्वसाधारण महिला, ८० वळके नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), ८१ नांदगाव पंचायत समिती गण अनुसूचित जमाती (सर्वसाधारण ) ८२ राजपुरी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला असे पडलेले आहे. या संपूर्ण पडलेल्या आरक्षणात तालुक्यातून पंचायत समिती गणात दोन महिलांसाठी तर दोन जागा या पुरु षांना लढवता येणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी नांदगाव पंचायत समिती गण आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची नाराजी पसरली आहे. येथे मागील वेळी इतर मागासवर्गीय महिला निवडून आली होती परंतु आता ही जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्याने नाराजी पसरली आहे.
सद्यस्थितीत मुरु ड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचा एक, शिवसेनेचा एक तर काँग्रेस आय पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे कोणत्याही पक्षास बहुमत प्राप्त करता आले नव्हते. एकमेकांची साथ घेत मुरु ड पंचायत समितीचे गठन करण्यात आले होते. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची युती होणार याकडे लक्ष असून त्यावरच बहुमत प्राप्त करता येणार आहे. शिवसेनेच्या काळी ठाकूर या केवळ आरक्षण असल्याने सभापती म्हणून विराजमान आहेत.

Web Title: Drop in the Muru Dunk for the earlier reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.