डॉ. आप्पासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Updated: May 14, 2017 22:52 IST2017-05-14T22:52:31+5:302017-05-14T22:52:31+5:30

निरूपणाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजप्रबोधन करत असलेले ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा

Dr. Happy Anniversary on Appasaheb | डॉ. आप्पासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. आप्पासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्क
रेवदंडा/ बिरवाडी : निरूपणाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजप्रबोधन करत असलेले ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस रविवारी मारुती आळीतील त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्रीसदस्यांनी गर्दी केली होती. येशील पारनाका परिसरात वाढदिवसानिमित्त भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. त्या होर्डिंगच्या समोर आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट तर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यापुढे आज ज्या पध्दतीने समाज प्रबोधनाचे कार्य विविध प्रकारे सुरू आहे त्याप्रमाणेच अविरत सुरू ठेवण्याचा मनोदय डॉ.धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. श्री सदस्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करताना धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाड विधानसभा मतदार संघाच्या वतीने आणि आ. भरत गोगावले यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हा प्रमुख बिपीन म्हामुणकर, रमेश पवार, सोनू उकीर्डे, सिद्धेश पाटेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Happy Anniversary on Appasaheb