- जयंत धुळप अलिबाग : डिझाइन थिंकिंगच्या पायावर एक प्रगत शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ७८ इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये डिझाइन थिंकिंग अनिवार्य केले आहे. परिणामी, अभियांत्रिकी अभ्यासक्र माशी अनिवार्य डिझाइन शिक्षणाचे एकात्मीकरण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे देशातील पहिले तंत्रज्ञान विद्यापीठ बनले आहे. महाराष्ट्रातील ७८ अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे सात हजार मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना या घोषणेचा लाभ होणार आहे. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत तज्ज्ञ समितीच्या शिफारशी अंती या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.आॅटोडेस्क व नासकॉम, तसेच क्षेत्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता यांच्या प्रतिनिधित्वाखाली, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत २००७ मध्ये स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने अभियांत्रिकी शिक्षणामध्ये डिझाइन सेंट्रिक फाउंडेशन कोर्सेसचा समावेश करण्याची शिफारस केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात राबवला जाणारा हा प्रोडक्ट डिझाइन इंजिनीअरिंग कोर्स नासकॉमसारख्या उद्योग जगतातील आघाडीच्या संघटनेतर्फे प्रमाणित आहे आणि तो थ्री-डी तंत्रज्ञानातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या आॅटोडेस्कसह संयुक्तपणे विकसित केला गेला आहे.विद्यार्थी घेणार प्रगत डिझाइनचे शिक्षणअभ्यासक्र माच्या सामग्रीमुळे इंजिनीअरिंग शिक्षणाच्या सुरु वातीच्या काळातच विद्यार्थ्यांना प्रोडक्ट इंजिनीअरिंग डिझाइनची आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतील आणि त्याद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल, असे उद्योग जगतात प्रवेशासाठी तयार मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सहकार्य होईल.फ्यूजन-३६०, इन्व्हेंटर यांसारखी प्रगत डिझाइन साधने वापरण्यास विद्यार्थ्यांना शिकता येईल आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांच्या प्रकल्पांमध्ये तांत्रिक कौशल्ये आणि डिझाइन थिंकिंग कौशल्ये यांचा विद्यार्थ्यांना वापर करता येईल.प्रोडक्ट डिझाइन इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्र मांद्वारे अभियांत्रिकीचे पदवीधर वास्तव जगतातील प्रोडक्ट डिझाइनच्या विविध टप्प्यांबाबत, म्हणजे अगदी संकल्पना ते निर्मितीपर्यंत, सजग होतात. नवीन साधने आणि तंत्रज्ञान शिकण्यासाठी, तसेच एकाच सामान्य ध्येयाच्या दिशेने विविध इंजिनीअरिंग शाखांच्या विविधतापूर्ण संस्कृतीचा विकास करण्यासाठी या नव्या अभ्यासक्र माचे निश्चितच सहकार्य लाभेल, असा आम्हाला विश्वास आहे.- डॉ. व्ही. जी. गायकर, कुलगुरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगडडिझाइन केंद्रित निर्मितीच्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा करता यावी, तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी ते सुसज्ज व्हावेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने डिझाइन एज्युकेशन अनिवार्य केले, त्याचे आम्ही स्वागत करतो. शिकणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक यांना पाठबळ देण्याकरिता आणि जगभरातील शैक्षणिक संस्थांना आॅटोडेस्क सॉफ्टवेअर आणि लर्निंग रिसोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात आम्हाला अभिमान वाटतो.- प्रदीप नायर, व्यवस्थापकीय संचालक, आॅटोडेस्क इंडिया अॅण्ड सार्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात डिझाइन थिंकिंग अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:33 IST