परिचारिका केंद्राची पडझड

By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30

रायगड जिल्ह्यातून उत्तम परिचारिका निर्माण करणाऱ्या अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी तळ आणि दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब

Downfall of the nurse center | परिचारिका केंद्राची पडझड

परिचारिका केंद्राची पडझड

- आविष्कार देसाई,  अलिबाग
रायगड जिल्ह्यातून उत्तम परिचारिका निर्माण करणाऱ्या अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी तळ आणि दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून एक प्रशिक्षणार्थी जखमी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत सातत्याने कळवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
परिचारिकेचे प्रशिक्षण घेण्यासाठी ठाण्यातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रावरच रायगड जिल्ह्यातील मुलींना अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे जिल्ह्यातील मुलींना जिल्ह्यातच परिचारिकेचे शिक्षण देता यावे, यासाठी अलिबागच्या सरकारी रुग्णालयाच्या परिसरात ७० च्या दशकात या परिचारिका प्रशिक्षण केंद्राची इमारत उभारण्यात आली होती.
सध्या या इमारतीमध्ये एएनएम आणि जीएनएमचे कोर्स शिकविले जातात. एएनएमसाठी ३९ आणि जीएनएमसाठी ६४ मुली प्रशिक्षण घेत आहेत. या मुली त्याच इमारतीमधील वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे एक परिचारिका अधिकारी, सहा. प्राध्यापक आणि तीन कर्मचारी असे एकूण नऊजण येथे काम करतात. इमारतीच्या तळमजल्यावरील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूचाही स्लॅब कोसळला असून तेथेच सुरक्षा रक्षक बसतो. स्लॅब पडला तेव्हा सुदैवाने सुरक्षा रक्षक तेथे नव्हता. येथील स्वच्छतागृहाचाही स्लॅब कोसळला असून पावसाळ््यात तेथून पाण्याचा धबधबाच वाहत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या मजल्याकडे जाणारे जीणेही जीर्ण झाले असून भेगा पडल्या आहेत. दुसऱ्या मजल्याच्या रूममध्ये शनिवारी स्लॅब कोसळल्याने विद्यार्थिनीच्या पायाला दुखापत झाली.

जीव मुठीत घेऊन
करावे लागते काम
इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सातत्याने पत्रव्यवहारही केला आहे. मात्र अलिबागचे उपअभियंता दिलीप विडेकर यांनी कोणतीच कारवाई केली नाही. आम्हाला जीव मुठीत घेऊन काम करावे लागते, असे परिचारिका अधिकारी शुभांगी मोरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

परिचारिका इमारतीचा स्लॅब पडला आहे. ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दुरुस्तीबाबत कळविले आहे. सध्या ज्या मजल्यावरील स्लॅब कोसळला आहे, तेथील मुलींची व्यवस्था नवीन इमारतीमध्ये केली आहे.
- डॉ. बाहुबली नागावकर,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

Web Title: Downfall of the nurse center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.