क्रिकेट स्पर्धेत दिव्यांग क्रि केट क्लब सहभागी

By Admin | Updated: May 14, 2017 22:51 IST2017-05-14T22:51:58+5:302017-05-14T22:51:58+5:30

बीडमध्ये अपंगांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय क्रि केट स्पर्धेत यावर्षी रायगडचा अपंग खेळाडूंचा क्रि केट संघ सहभागी होणार आहे

Divya Kri Kate Club participants in the Cricket tournament | क्रिकेट स्पर्धेत दिव्यांग क्रि केट क्लब सहभागी

क्रिकेट स्पर्धेत दिव्यांग क्रि केट क्लब सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्ली-मांडला : बीडमध्ये अपंगांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय क्रि केट स्पर्धेत यावर्षी रायगडचा अपंग खेळाडूंचा क्रि केट संघ सहभागी होणार आहे. त्याकरिता अपंग खेळाडूंचा रोहा तालुक्यातील धाटाव येथील क्र ीडा मैदानावर अपंग खेळाडू सराव करीत आहे.
दरवर्षी राज्यस्तरीय क्रि केट स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी रायगडचा दिव्यांग क्रि केट क्लबने सहभागी व्हावे अशी इच्छा रायगड जिल्हा अपंग संघर्ष समितीचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी व्यक्त के ली होती. त्याला साईनाथ पवार यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील खेळाडू हे एकत्र आले. त्यांनी क्रि केटचा संघ बनविला आणि त्या संघाला नाव दिले गेले दिव्यांग क्रि केट क्लब रायगड. या संघाची स्थापना १४ एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अलिबाग येथे करण्यात आली.
अपंग हा कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. आमच्या दिव्यांग संघात कोणी हाताने तर कोणी पायाने अपंग
आहे. मात्र क्रि केट खेळताना ते अपंगत्वावर सहजपणे मात करीत आहेत. रायगडचा संघ हा बीड येथे होणाऱ्या स्पर्धेत विजयाची पताका फडकवणार असा विश्वास अपंग संघर्ष अध्यक्ष साईनाथ पवार यांनी व्यक्त के ला.

Web Title: Divya Kri Kate Club participants in the Cricket tournament