शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा आणि दुहेरी खून खटला: अखेर १० आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:00 IST

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले.

जयंत धुळपअलिबाग : दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले. अखेर या प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील १२ पैकी १० आरोपींना मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी दोषी ठरविले. सोमवारी १६ आॅक्टोबर रोजी अंतिम निकाल देण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) मधून या सर्व आरोपींची मुक्तता केलीे.उर्वरित कलमांन्वये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या १२ पैकी १० आरोपींमध्ये नवनाथ विक्र म भोसले (३२, रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्र म भोसले (२९, रा.घोसपुरी, अहमदनगर), छोट्या ऊर्फ सतीश जैनू काळे (२५, बिलोणी,औरंगाबाद), आनंद अनिल रायमोकर (३८, बेलंवडी, श्रीगोंदा, अहमदनगर), अजित अरु ण डहाळे (२८, श्रीगोंदा, अहमदनगर), विजय ऊर्फविज्या बिज्या काळे (२८, श्रीगोंदा, अहमदनगर), ज्ञानेश्वर विक्र म भोसले (३४, घोसपुरी,अहमदनगर), खैराबाई विक्रम भोसले (५६, घोसपुरी,अहमदनगर), कविता ऊर्फ कणी राजू काळे (४४, हिरडगाव, श्रीगोंदा, अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार (५६, श्रीगोंदा, अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिती सरकार पक्षाकडून या खटल्याचे न्यायालयात काम पहाणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी दिली आहे. न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या दोघांमध्ये गणेश विक्र म भोसले (२६, घोसपुरी,अहमदनगर) आणि विक्र म हरिभाऊ भोसले (६६,घोसपुरी, अहमदनगर) यांचा समावेश असल्याचे अ‍ॅड.पाटील सांगितले.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिध्द सुवर्ण गणेश मंदिरात ही घटना २४ मार्च २०१२ रोजी रात्री ही घटना घडली. मंदिराचे पहारेकरी महादेव घडशी आणि अनंत भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करुन सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३९६, ३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.श्रीवर्धनचे तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीसचे विद्यमान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, दिघा सागरी पो. ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इगतपुरी (नाशिक) पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आॅक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :ThiefचोरRaigadरायगडCrimeगुन्हा