जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती
By निखिल म्हात्रे | Updated: January 2, 2023 20:09 IST2023-01-02T20:09:14+5:302023-01-02T20:09:39+5:30
Raigad: रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नतीने सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती
अलिबाग - रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नतीने सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट 2021 मध्ये नियुक्त झालेल्या डॉ. कल्याणकर यांच्या कडे मागील काही महिन्यांपासून कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांची जागा अद्याप रीक्त आहे.
डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपत्कालीन परिस्थितीत खंबीर पणे उभं राहून रायगडकरांचे पालकत्व स्वीकारले होते. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी तात्काळ सोडविले होते. तर कोरोना कालावधीत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता. 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे डॉ. महेंद्र कल्याणकर कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यानंतर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून योग्य भूमिका बजावली आहे.