लालूप्रसाद यादव यांना डिस्चाजर्
By Admin | Updated: September 14, 2014 01:20 IST2014-09-14T01:20:42+5:302014-09-14T01:20:42+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधून घरी पाठविण्यात आले.

लालूप्रसाद यादव यांना डिस्चाजर्
मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधून घरी पाठविण्यात आले. 27 ऑगस्ट रोजी लालूप्रसाद यादव यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मात्र पुढचे काही महिने औषधे सुरू राहणार आहेत. 24 ऑगस्ट रोजी लालूप्रसाद यादव यांना एशियन हार्ट इन्स्टिटय़ूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांना घरी पाठविण्यात आले, या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राबडीदेवीदेखील होत्या. लालूप्रसाद यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मात्र पुढचे अडीच महिने औषधे घ्यावी लागणार आहेत. तसेच काही महिने दिलेला व्यायाम करावा लागणार आहे, असे डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले.