शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मुलांसाठी पुण्यात शाळा, तर नागपुरात हॉस्टेल उभारणार, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 16:53 IST

पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरू करणार असून, नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे.

- जयंत धुळपरायगड- पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरू करणार असून, नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात राबविण्यात येणा-या पोलीस कल्याण योजनेबाबत जागरूकता पोलीस कर्मचा-यांमध्ये निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये पोलीस महासंचालक माथुर यांच्या संकल्पनेने चालू वर्षाच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पोलीस कल्याण सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक माथुर यांच्या हस्ते करण्यात आला.पोलीस व कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेऊन दिली समाधानकारक उत्तरेपोलीस महासंचालक माथुर यांनी रायगड जिल्हा पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरिता दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारामध्ये पोलीस व त्याच्या कुटुंबीयांनी मांडलेल्या समस्या व प्रश्न जाणून घेऊन माथुर यांनी पोलीस व त्यांचे कुटुंबीयांचे समाधान होईल, अशी उत्तरे दिली. पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलतीच्या सहलीच्या गाडीला पोलीस महासंचालक माथुर यांनी हिरवा झेंडा दाखवून ती प्रवासाकरिता रवाना केली. रायगड पोलीस पेट्रोलपंपाचे उद्घाटन व पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविलेल्या योजना आणि उपक्रमासंदर्भातील पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी माथुर यांच्या हस्ते करण्यात आले.पोलीस कल्याणांतर्गत विविध उपक्रमांचे उद्धाटनमहाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीची स्थापना करण्यात आली. पोलीस कल्याण निधीतील साधन-संपत्तीचा वापर पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी करण्यात येतो. त्याच अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबीयांसाठी सेवा, शिक्षण, आरोग्य आदी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अनुदान, पुस्तक अनुदान, बिनव्याजी कर्ज, महाराष्ट्र दर्शन सहल, व्यवसाय मार्गदर्शन, नोकरी मेळावा, कौशल्य मेळावा, कुटुंब आरोग्य योजना, समाधान हेल्पलाइन, महिला पोषण आहार योजना, सबसिडी कँटिंग, पेट्रोलपंप इत्यादी कल्याणकारी योजनाचा समावेश करण्यात आला आहे.कोकणातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थितीकार्यक्रमास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, रत्नागिरी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय निघोट तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे व शाखांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिस