शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, किरीट सोमय्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:06 IST

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली.

अलिबाग

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली. किरीट सोमय्या यांनी कालच आपण कोर्लई गावाला भेट देऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज ते कोर्लई गावात येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली होती. भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं ग्रामपंचायत परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त संपूर्ण परिसरात ठेवला होता. ग्रामपंचायतीला भेट देऊन किरीट सोमय्यांनी एक पत्रक ग्रामसेवकांना दिलं आणि ते रेवदांडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निगाले. रेवदांडा पोलिसांशी चर्चा केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

"सरपंच म्हणतात बंगले अस्तित्वात नाहीत. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. मग नेमकं खरं काय? हे जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो. यासंपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. चर्चा एकदम व्यवस्थित झाली आहे. शिवसैनिक जमले होते. पण पुण्यासारखा प्रसंग इथं घडलेला नाही", असं किरीट सोमय्या म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर उपस्थित केला सवाल"ग्रामपंचायत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिनिधीत्व करत आहे. ग्रामपंचायत म्हणते की सदरहू जागेवर बंगले अस्तित्वात नाहीत. पण मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. नेमकं खरं काय आहे ते कळायला हवं. आम्ही ग्रामसेवकाला कागदपत्रे दिली. त्यावर आजची स्थिती दोन दिवसात कळवतो असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन चार तासांमध्ये बंगले कसे गायब होतात. सकाळी म्हणतात बंगले आहेत आणि दुपारी म्हणतात बंगले नाहीत. आता दोन-तासांत उद्धव ठाकरेंनी येऊन बंगले तोडले असतील तर पोलिसांनी चौकशी करावी. महाराष्ट्राच्या जनतेला मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही रश्मी ठाकरे यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का? हे सर्वांना कळू द्या", असं किरीट सोमय्या म्हणाले. 

सोमय्या निघून जाताच ग्रामपंचायतीचं शुद्धीकरणकिरीट सोमय्या ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पंचायत कार्यालयात सोमय्या गेले आणि पाचच मिनिटांत ते बाहेर आले. सोमय्या यांनी सरपंच मिसाळ यांना नमस्कार केला आणि खुर्चीत बसले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी एक पत्रक ग्रामपंचायतीला दिलं. त्यानंतर किरीट सोमय्या आणि प्रशांत ठाकूर कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी ग्रामपंचायतशी एकाशब्दानंही चर्चा केली नाही किंवा कोणत्याही माहितीची विचारपूस केली नाही. ते केवळ ड्रामेबाजीसाठी आले होते, अशी टीका सरपंच प्रशांत मिसळ यांनी केली आहे. किरीट सोमय्या तिथून निघून जाताच शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचं गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केल्याचंही मिसाळ यांनी सांगितलं.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना