शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगरला खड्ड्यांचे ‘विघ्न’; पर्यटकांना चालावे लागते चिखलातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:16 IST

ग्रामपंचायतीने खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी

दिघी : निळाशार नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. त्यामुळे वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मात्र, समुद्रकिनारी या खड्डेमय रस्त्यावरून ये-जा होत असताना पर्यटक व स्थानिकांना चिखलातून चालावे लागते.दिवेआगर येथे येणाऱ्या पर्यटकांनी रस्त्यावर खड्डे असल्याने नाराजी व्यक्त केली. सध्या पावसाळ्यात पर्यटन हंगाम थोडाफार कमी असलातरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी असते. स्थानिक व पर्यटकांना चिखलमय रस्त्यांच्या खड्ड्यांतून जावे लागते. या रस्त्यावरून जाताना समुद्रातील बोटीने प्रवास केल्याचा भास होतो. रस्त्यावर अगणित खड्डे चिखलयुक्त पाण्याने भरलेले पाहायला मिळतात. गणेशोत्सव, दिवाळी सुट्टीत फिरण्यासाठी अनेक पर्यटक खास करून दिवेआगर समुद्रकिनाºयाला पसंती देतात. समुद्रकिनारी मुख्य रस्त्यांवर खड्डे दुरुस्ती झाल्यास या भागातून ये-जा करणे सोयीचे होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन समुद्रालगत जोडणाºया रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. एका बाजूला शासन पर्यटकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबवित असतो. तर दुसºया बाजूला तेच उपक्रम निधीअभावी फोल ठरत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दिवेआगर समुद्रालगत जाणारे रस्ते पक्के स्वरूपात केले नाहीत.बैलगाडी जाण्यामुळे या रस्त्यावर खड्डे बनत आहेत. पावसाळा संपताच ग्रामपंचायत निधीतून रस्ता करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया दिवेआगर सरपंच उदय बापट यांनी बोलताना दिली.गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे आवाहनमुरुड जंजिरा : पुढच्या महिन्यात गणरायाचे आगमन होत असून, या अगोदरच सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने कामाला लागून मुरुड तालुक्यातील खड्डे पडलेले रस्ते बुजवून टाकावे व स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, असे प्रतिपादन अलिबाग व मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार पंडित पाटील यांनी केले. गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांची स्थिती चांगली असावी, या उद्देशाने स्थानिक आमदार पाटील यांनी शीघ्रे येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवार, २० आॅगस्ट रोजी एका विशेष सभेचे आयोजन केले होते.या वेळी तालुका चिटणीस मनोज भगत, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, धर्मा हिरवे, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, माजी सरपंच अजित कासार, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुरुड येथील सहायक अभियंता शैलेश शिंदे, सहायक अभियंता नीलेश खिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले की, साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी शासनाकडून सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची कितपत प्रगती आहे याचा बांधकाम खात्याने खुलासा करावा, यावर सहायक अभियंता शैलेश शिंदे यांनी सांगितले की, सदरचे काम निविदा स्तरावर आहे. गणपती उत्सवानंतर या कामाला सुरुवात करू, असे सांगितले. यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, निविदा स्तरावरची कार्यवाही तातडीने उरकून घ्यावी व लवकरात लवकर या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली पहिजे. सदरील रस्त्याच्या डांबरीकरणामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, पर्यटक संख्येत निश्चितच वृद्धी होईल, असा आशावाद या वेळी आमदारांनी व्यक्त केला.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगड