शहरं
Join us  
Trending Stories
1
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
2
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
3
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
4
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
5
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
6
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
8
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
9
धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
10
या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
11
बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
12
Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
13
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
14
₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी
15
अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट
16
Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
17
लंडनमध्ये राहणाऱ्या अब्जाधीशांना झटका! अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार; भारतात काय निमय?
18
३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo
19
IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे
20
वेळेवर EMI भरूनही CIBIL Score का घसरतो? 'क्रेडिट मिक्स' आणि इतर ४ महत्त्वाची कारणे जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये शेतीचे ९००० हेक्टर क्षेत्र नष्ट; शेतकऱ्यांचे मोेठे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:53 IST

अतिवृष्टीमुळे पेण, माणगाव, महाडमधील भातशेती गेली वाहून; पुरामुळे शेतात साचला गाळ

- दत्ता म्हात्रेपेण : तालुक्यात रविवारपासून पावसाने कहर केला. सतत तीन दिवस पुराचे थैमान, जनजीवन विस्कळीत, भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संसार उघड्यावर पडले. बुधवार, गुरुवार दोन दिवस पुराचे पाणी ओसरल्यावर शेतीचे जे चित्र नजरेसमोर आले आहे, ते पाहून शेतकऱ्यांना अश्रुधारा आवरणे कठीण झाले. पेणमधील शेती शिवारात पुराचा तडाखा व वाहून आलेला गाळ पिकांवर बसून शेती कुजली आहे.पेणमधील लागवड केलेल्या भातशेतीपैकी ९००० हेक्टर क्षेत्रातील शेती नैसर्गिक आपत्तीत नामशेष झाली आहे. शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे. राज्य सरकार आता कशाप्रकारे मदत सहकार्य करते याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. बाधित गावे, उघड्यावरचे संसार, शेती, शेतीपूरक व्यवसाय, मत्स्यपालन व्यवसाय, भाजीपाला शेती, फळबागा लागवड, झाडांची पडझड, लघुउद्योग, कुटीर उद्योग, गणेशमूर्ती कारखान्याचे मूर्तीचे नुकसान, घरातील सामान, धान्य, कडधान्य, कपडे, घरांतील खतांच्या गोणी, औषधे, मुलांचे दप्तर, पुस्तके, भांडी, इलेक्ट्रिकल साधने शीतकपाट,टीव्ही, दुकानातील सामान, घरांची पडझड, ग्रामीण भागातील रस्ते, खारभूमी संरक्षक बंधारे, विहिरी, गावातील तलावांच्या संरक्षक भिंती, गुरे, दूध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, शेततळ्यातील मासे, फुलशेती, पाणी स्रोत शाळा, अंगणवाड्या, समाज सभागृह, धान्याची कमतरता आदी गोष्टी लक्षात घेतल्यास पेणमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.५०० कोटींच्यावर नुकसानीचा आकडा -धैर्यशील पाटीलगेले पाच दिवस पुराचे थैमान सबंध पेणमध्ये होते. कणे, बोर्झे, वाशी, वढावकर ते भाल विठ्ठलवाडीपर्यंत पूर परिस्थिती गंभीर होती. कणे खाडीचे बांध फुटल्याने या पाण्याने सर्व ठिकाणी थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. भातशेती पाण्याखाली गेली. पाच दिवस हेच चित्र जोहे, कळवे, तांबडशेत, दादर या गावामध्ये होते.येथील गणेशमूर्ती कारखान्याचे मूर्तींचे नुकसान झाले आहे. शिर्की,मसद, गडब आमटेम, पाबळ,यासह जिते, दुष्मी,करोनी, दुरशेत अशा सर्व ठिकाणी व पूरपरिस्थितीचा ग्रामस्थांनी एकजुटीने सामना केला आहे. परिस्थिती भयानक आहे. आर्थिक नुकसानीची मोजदाद करता येणार नाही. तरीही सर्व स्तरांवर ५०० कोटी रुपयांच्यावर आर्थिक नुकसानीचा आकडा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, गणपती कारखाने, शेतीपूरक व्यवसाय, पाळीव दुभती जनावरे, भाजीपाला, फळबागा, व्यापारी, ग्रामीण इन्फास्ट्रक्चर, पाणी योजना, रस्ते, शाळा, समाज मंदिर, धान्य, कपडे,व इतर गोष्टी लक्षात घेतल्यास ही आर्थिक नुकसानी फार मोठी आहे. पेणसाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक मदतीची मागणी मी करणार आहे. सरकार आता कशाप्रकारे मदत सहकार्य करते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. या पत्रकार परिषदेप्रसंगी शेकापचे चिटणीस दिनेश पाटील आदी उपस्थित होते.पूर ओसरला; मात्र शेतकऱ्यांचे डोळे पाणावले- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यात २४ जुलैपासून सातत्याने पाऊस पडत आहे, यामुळे नदीकाठची भातशेती सलग सातव्या दिवशीही पाण्याखाली गेली आहे. त्यातच मंगळवारी आलेल्या पुराने या नुकसानीत भर पडली आहे. महाडमध्ये आलेल्या पुराने शेतात मोठ्या प्रमाणात आलेल्या चिखलाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून याबाबत तत्काळ दखल घेऊन शेतकºयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.महाड तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत शेजारील भात शेती आणि शहरात प्रवेश केला. यामुळे पुराच्या पाण्याबरोबर आलेला चिखल, कचरा मोठ्या प्रमाणात भातशेतात साचून राहिला आहे. शिवाय, गेले सात दिवस महाड आणि परिसरात सतत पुराचे पाणी शेतात दाखल होत असल्याने भात रोपे पाण्याखाली राहिली होती. त्यातच मंगळवारी अचानक प्रचंड वेगाने महाड तालुक्यातील वाळण, बिरवाडी, रायगड परिसर, खाडीपट्टा, दासगाव, महाड शहर या भागात पुराचे पाणी शिरले. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आली. यामुळे भात रोपे आता कुजण्याची शक्यता आहे. काही भागातील भातशेती पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली आहे. जी भातशेती नदीकिनारी आहे त्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. महाडमध्ये २४ जुलैपासून सातत्याने नदीकिनाºयावरील भातशेती पाण्याखाली जात आहे. किमान दोन आठवडे महाड तालुक्यातील भातशेती सतत पाण्याखाली राहिल्याने अनेक भागातील भाताची रोपे पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागातील शेती कुजली आहे. मंगळवारी आलेल्या पुराने तर हाहाकार माजवला. महाड आणि परिसरात पाण्याची पातळी वाढली. प्रचंड वेगात पुराचे पाणी आल्याने भात रोपे वाहून गेली आहेत.शेतात चिखल आणि काही भागात जमीन खचल्यानेही नुकसान झाले आहे. दासगाव खाडी पट्ट्यातील दासगाव, वहूर, केंबुर्ली, जुई, तुडील, चिंभावे आदी भागातील सावित्री नदी आणि खाडीकिनारी असलेल्या भातशेतीला या पुराचा फटका बसला आहे. आधीच विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकºयाला पुन्हा या पुराचा फटका बसल्याने महाड तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.बागायतदार धास्तावलेरेवदंडा : मागील आठवड्यापासून पावसाने कहर केला असून पाऊस अद्यापि न थांबल्याने आता भातशेतीची लावणीची कामे शेतात पाणी साठल्याने ठप्प आहेत. सुपारी बागायतदार पडत असलेल्या पावसाने सुपारी पिकावर कोळे रोग येण्याची भीती व्यक्त करताना दिसत आहे.अद्यापि परिसरातील जनजीवन विस्कळीत असून सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून आंबा,नारळ व सुपारी झाडे बागायतीत मोठ्या संख्येने उन्मळून पडलेली दिसत आहेत. बागायतदार वृक्षतोड करणाºया पाडेकºयांच्या शोधात दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी