शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

बंदी असतानाही दिवेआगरमध्ये खवळलेल्या समुद्रात बोटिंग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:30 PM

२५ मेपर्यंतच होती परवानगी; मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष

- अभय पाटीलबोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रात पर्यटकांच्या मौजेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी २५ मेपर्यंतच स्पीड बोट सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाचा आदेश धुडकावून दिवेआगर समुद्रात १५ व १६ जून या सुटीच्या दिवशी खवळलेल्या समुद्रात बोटिंग सुरूच असल्याचे निदर्शनास आले. याकडे मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष होत असून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.दिवेआगर समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून सुटीमध्ये लाखो पर्यटक याठिकाणी येतात. समुद्रकिनारी घोडागाडी, सँड बाइक त्याचप्रमाणे समुद्रामध्ये स्पीड बोट, बनाना बोट व इतर बोटिंग करण्याची मजाही पर्यटक घेत असतात. याठिकाणी पॅरासिलिंग देखील सुरू असते. परंतु मुरुड येथे पॅरासिलिंगमधून पडून झालेल्या दुर्घटननंतर दिवेआगरात पॅरासिलिंग मे महिन्यात बंद केली आले.समुद्रात होणारे बोटिंगही २५ मेनंतर बंद करण्याचे लेखी आदेश मेरिटाइम बोर्डाने दिले आहेत. मात्र काही बोटमालकांकडून सुटीच्या कालावधीत पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन खवळलेल्या समुद्रात १५ व १६ जून रोजी स्पीड बोट सेवा सुरू ठेवण्यात आली होती. याबाबत बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या सुटीवर असून याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.