शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे 100 दिवस पूर्ण होऊनही आमच्या 'भावा'ला बंगला मिळेना : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 13:21 IST

एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी बंगलेच सोडले नसल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला.

मुंबई : नवीन सरकार येऊन 100 दिवस उलटले असूनही गेल्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आपले बंगले सोडले नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. सरकार येऊन 100 दिवस झाले पण आमच्या भावाला अजूनही बंगलाच मिळाला नाही. तर एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी बंगलेच सोडले नसल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला.

रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना मंत्रालयात भेटायचं असेल तर ते अशक्य आहे. एकतर अजित पवार हे सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. दरवाजे उघडणाऱ्यांच्या आधी दादा तिथे पोहचतात. त्याचं कारण म्हणजे, आमच्या भावाला अजूनही बंगलाच मिळाला नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

सरकार येऊन 100 दिवस झाले पण 'दादा'ला घर मिळाला नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजपवर टीका केली. आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे बंगले सोडायला तयार नाही, त्यामुळे आमच्या मंत्र्यांना बंगलेच मिळत नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपा सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहण्यासाठी दिला होता. नवीन सरकार आल्यापासून १०० दिवस झाले तरी मुनगंटीवारांनी अद्याप देवगिरी बंगला रिकामा केला नाही. त्यामुळे अजित पवार सध्या चर्चगेटच्या एका इमारतीत वास्तव्यास आहेत.