शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वाड्या सुविधांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 23:14 IST

कर्जतमधील आदिवासींचे हाल : रु ग्णांना चादरीच्या डोलीतून न्यावे लागते उपचारासाठी

नेरळ : मुंबईपासून हाके च्या अंतरावर असलेल्याकर्जत तालुक्यात विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांचे लक्ष आदिवासी भागातील वाड्या पाड्यापर्यंत जात नसल्याने, तालुक्यात आजही काही ठिकाणी आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना रस्त्याअभावी आजारी व्यक्तीस डोलीच्या आधाराने रुग्णालयात पोहोचवावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. नेते कार्यकर्ते गावा गावात, वाड्या-पाड्यात फिरून मतांचा जोगवा मागत आहेत. एरव्ही ढुंकूनही न पाहणारे राजकारणी आत्ता मात्र निवडणूक काळात प्रचारासाठी आदिवासी भागातील रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. आश्वासनाची खैरात वाटत आहेत. आम्ही हे करू आम्ही ते करू अशा प्रकारे विकासाची स्वप्न दाखवत आहेत. मात्र, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही आजतागायत या भागांचा विकास झाला नाही. किमान रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून ही वंचित राहिल्याचे दिसत आहेत. आजही आदिवासी महिलांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण करावे लागत असून, अनेक ठिकाणी रस्तेच नाहीत, तर असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे आदिवासींचे हाल होत आहेत.मूलभूत सुविधा देण्याची मागणी१काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील बेकरेवाडी येथील सखू नारायण पारधी या महिलेला दवाखान्यात उपचारासाठी चादरीची डोली करून नेण्यात आले.२रस्त्या अभावी या वाडीत कोणतेही वाहन पोहोचत नाही, अशीच स्थिती चिंचवाडी, अशेनेवाडी, सागाची वाडी, भूतीवली वाडी, बोरीची वाडी, धामण दांडा या आदिवासी वस्त्यांमध्ये पाहावयास मिळत आहे.३विकास राहिला दूर निदान मूलभूत सुविधा तरी आम्हाला मिळाव्यात अशी माफक अपेक्षा दुर्गम भागातील नागरिक करत आहेत.एक महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचे रु ग्णालयात निधन झाले, त्यांना घरी अंत्यविधीसाठी नेण्यासाठी आम्हाला डिकसल पाली ते चिंचवाडी हे एक तासभराचे अंतर मृतदेहाला चादरीची डोली करून न्यावे लागले. आमच्या वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही. पाणी फक्त पावसाळ्यातच उन्हाळी दिवसात डवरे खोदून पाणी शोधावे लागते.- अरविंद सुतक, ग्रामस्थ चिंचवाडीआमच्या भागातील वाड्यांना पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे आजारी माणसाला चादरीची झोळी करून न्यावे लागते. कोणतेही वाहन वाडीत जात नाही, मला रोज चालतच कामाला यावे लागते.वाडीजवळच पाली भूतीवली धरण आहे, तरी आमच्या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई असते.-बाळू कमळू पारधी,ग्रामस्थ, भूतीवलीवाडी