कर्जत शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:15 PM2019-07-23T23:15:01+5:302019-07-23T23:15:17+5:30

नगरपालिका सतर्क: फवारणीला सुरुवात; पथकाकडून पाहणी

Dengue patient found in Karjat city | कर्जत शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण

कर्जत शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण

Next

नेरळ / कर्जत : पावसाने दडी मारल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत शहराच्या गुरुनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने पालिका सतर्क झाली असून, विशेष फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहरात ५० पेक्षा मागे पडलेल्या कर्जत शहरात अस्वच्छता यामुळे डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. शहराच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिलेला असतो, त्या कचऱ्याच्या ढिगाचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना दाखवले होते. मात्र, नगरपालिकेने त्याकडे केलेले दुर्लक्ष याचा परिणाम डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने पालिकेचे स्वच्छतेचे दावे फोल ठरले आहेत. त्यात गुरुनगर सारख्या चांगल्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने कर्जत नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

नगरपालिकेला त्या डेंग्यूसदृश रुग्णाची माहिती मिळताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांना कळविले. त्यानंतर नगराध्यक्ष जोशी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पथकासह गुरुनगर भागात जाऊन तेथे
असलेल्या सांडपाणी वाहून

नेणाºया गटारांची पाहणी केली. त्यानुसार रुग्ण ज्या भागातील आहे तेथील एक भिंत गटारावर पडल्याने सांडपाणी वाहून नेणारे गटार बंद झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी पसरले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्ष जोशी यांनी तत्काळ नगरपालिकेच्या पथकाला पाचारण केले. त्यांच्याकडून सांडपाणी वाहून नेणारे गटारे मोकळे करून घेतले आहे. त्यानंतर आता शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. त्यात डेंग्यूसदृश रुग्णांवर कर्जतच्या बाहेर उपचार सुरू असल्याने त्याचा संसर्ग होणार नाही, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली आहे.

शहरात गटारे कुठेही तुंबून राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येत असून शहराच्या सर्व भागात फवारणी केली जाणार आहे. ते काम निश्चित काळात पूर्ण करून पावसाळ्यात साथीचे आजार बळावू नयेत, यासाठी आम्ही फवारणी करण्याचे काम कायम सुरू ठेवणार आहोत. - सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष

Web Title: Dengue patient found in Karjat city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.