सुट्टीच्या दिवशीही गणेशोत्वसासाठी टोल फ्री पासेस सुरु ठेवण्याची मागणी
By वैभव गायकर | Updated: September 15, 2023 18:25 IST2023-09-15T18:24:24+5:302023-09-15T18:25:13+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पनवेल: सरकारने गणेशोत्सवासाठी टोल फ्री ची घोषणा केली आहे. मात्र दि.15 ला दुपारपर्यंत तरी आरटीओ कार्यालय ...

सुट्टीच्या दिवशीही गणेशोत्वसासाठी टोल फ्री पासेस सुरु ठेवण्याची मागणी
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल: सरकारने गणेशोत्सवासाठी टोल फ्री ची घोषणा केली आहे. मात्र दि.15 ला दुपारपर्यंत तरी आरटीओ कार्यालय पनवेल याठिकाणाहून कोणतेही टोल फ्री पासेस वितरित करण्यात आले नव्हते. सायंकाळी पाचनंतर पास देण्य़ास सुरुवात करण्यात आली. यामुळे पनवेल शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून लवकरात टोल फ्री पासेसची प्रक्रिया पूर्ण करण्याची सुचना प्रशासनाला देण्याची विनंति केली आहे.
शुक्रवार दि.15 दुपारपर्यंत प्रशासनाला याबाबत कोणत्याही प्रकारचे टोल फ्री बाबत आदेश प्राप्त झाले नाहीत. अशावेळी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस असल्याने आरटीओ कार्यालय बंद असणार आहेत. मात्र चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने आरटीओ कार्यालयात एक खिडकी सुरु ठेवून चाकरमान्यांना टोल फ्री पासेस वितरित करण्याची मागणी सुदाम पाटील यांनी केली आहे.