रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: February 14, 2017 04:55 IST2017-02-14T04:55:40+5:302017-02-14T04:55:40+5:30

कोलाड तिसे येथील रेल्वे फाटकाच्या हद्दीत सोमवारी १३ फे ब्रुवारीलासकाळी ८.३० ते ९.३० च्या सुमारास सकाळी फीरायला गेलेल्या

Death of a woman in a railway accident | रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू

रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू

रोहा : कोलाड तिसे येथील रेल्वे फाटकाच्या हद्दीत सोमवारी १३ फे ब्रुवारीलासकाळी ८.३० ते ९.३० च्या सुमारास सकाळी फीरायला गेलेल्या नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला कोकण रेल्वेने जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यामुले सर्व कोलाड परिसरात हळ-हळ व्यक्त होत आहे.
मीनाक्षी उर्फ सुहासिनी सुहास जंगम(२६, रा.तोड्सुरे जंगम वाडी) ही नऊ महिन्याची गरोदर असणारी माहिला तीसा ( कोलाड ) या गावी फिर्यादी चंद्रकांत जंगम यांच्या घरी आली होती. ती गरोदर असल्यामुळे नेहमी प्रमाणे सकाळी ८ ते ९ च्या सुमारास फिरण्यासाठी तिसे येथील अंतर्गत रस्त्यावर आली. त्यातच ती तिसे रेल्वे फाटकाच्या नजिक आल्याने त्या महिलेला कोकण रेल्वेने धडक दिली, या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. शव रोहा प्रथमिक आरोग्य केंद्रात हलवीण्यात आले असून या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

Web Title: Death of a woman in a railway accident