तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी ठोकले रुग्णालयाला टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 11:33 PM2020-02-02T23:33:19+5:302020-02-02T23:33:47+5:30

सुकेळीत तणाव

Death of a three-month-old child; Angry villagers avoid hitting hospital | तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी ठोकले रुग्णालयाला टाळे

तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी ठोकले रुग्णालयाला टाळे

Next

नागोठणे : सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या बी. सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या जिंदाल रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथे उपचारासाठी आणलेल्या एका तीन महिन्यांच्या बालकाला पुढील उपचारासाठी कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पनवेलला नेत असताना महामार्गावर वडखळनजीक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना कळल्यावर संताप अनावर झाल्याने ग्रामस्थांनी शनिवारी मध्यरात्री रुग्णालयाला टाळे ठोकल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मनोहर सुटे यांनी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान सुकेळी येथील किशोर तेलंगे यांचा फोन आला व त्यांच्या सहा वर्षीय पुतण्याच्या गालाला काहीतरी चावले असून, त्याला जिंदाल रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे, असे सांगितल्याने स्वत: तातडीने या रुग्णालयात आलो. त्याच दरम्यान गणपतवाडी या आदिवासीवाडीतील तीन महिन्यांच्या बालकाला रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र, येथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले.

प्रशासकीय अधिकारी भरोसे यांना फोन केला असता, त्यांनी उचलला नसल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, सर्वांचेच फोन बंद होते, तेव्हा कंपनीच्या टेलिफोन आॅपरेटरला फोन करून कंपनीचे सुरक्षारक्षक येथे पाठविण्यास सांगितले व नागोठणे पोलीसठाण्यात फोन करून पोलिसांना पाचारण केले असल्याचे सांगितले.

बालकाला पुढे नेण्यासाठी कंपनीची रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यावर नागोठण्यातील कोकणे रुग्णालयात नेले असता, तेथून त्याला पनवेलच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, या बालकाला रस्त्यातच मृत्यूने गाठले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री रुग्णालयाला टाळे ठोकले. याबाबत रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राहुल भरोसे यांच्याशी संपर्क होऊ शकली नाही.

Web Title: Death of a three-month-old child; Angry villagers avoid hitting hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.