मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: March 26, 2017 03:05 IST2017-03-26T03:05:17+5:302017-03-26T03:05:17+5:30

कर्जत तालुक्यातील आसल ठाकूरवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने हिरामण भागू सांबरी

The death of the teenager by climbing under a clay | मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने तरुणाचा मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने तरुणाचा मृत्यू

नेरळ : कर्जत तालुक्यातील आसल ठाकूरवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने हिरामण भागू सांबरी या आदिवासी  तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
कर्जत तालुक्यातील आसल ठाकूरवाडी येथील कुटुंब सायंकाळी ५च्या सुमारास नवीन घरासाठी डोंगर पोखरून माती काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी मातीचा ढीग अचानक अंगावर कोसळल्याने हिरामण सांबरी ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि त्याचा मृत्यू झाला. या वेळी
भागू साबरी, सुरेख हिरामण साबरी, अनिल पाडू उघडे असे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डिकसळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी व नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.

Web Title: The death of the teenager by climbing under a clay