शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडी येथे काळ नदीत मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेनंतर बिरवाडीमधील नागरिकांनी संताप व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रामध्ये प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना कुंभारवाडा येथील नागरिक दीपक स्वाई यांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीवर अवलंबून पाणी योजनाही अडचणीत सापडल्या आहेत. अशा प्रकारांमुळे बिरवाडी काळ नदीपात्रातील मासेमारी धोक्यात आल्याने आदिवासी भोई बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप किनारा कुंभारवाडा येथील कल्पेश उर्फ राजू लक्ष्मण पवार यांनी केला. या घटनेनंतर असनपोई ग्रामस्थ हनुमंत पवार यांनी पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बिरवाडीमधील नागरिक आक्रमक झाले.औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असल्याचा आरोप बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी केला आहे. वारंवार नदीपात्रात उद्भवणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणी